.

सुस्वागतम्

सुस्वागतम....सुस्वागतम.... प्राथमिक शिक्षक मित्र या आपल्या शैक्षणिक blog आपले स्वागत.

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१७

​संगणकातील F1 ते F12 या key चे उपयोग​

👇👇👇👇🇮🇳🇮🇳🇮🇳

​संगणकातील F1 ते F12 या key चे उपयोग​​F1 Key​

एखादा प्रोग्रॅम किंवा साॅफ्टवेअर वापरण जमत नसेल तर ‘help’मध्ये जावं लागतं. help चं बटण मिळत नसेल तर खुशाल F1 दाबावं. help मेनू ओपन होतो.

​F2 Key​

एखाद्या फाईल किंवा फोल्डरचं नाव बदलायचं असेल तर F2 दाबून हे काम झटक्यात करता येतं

​F3 Key​

एखाद्या साॅफ्टवेअर किंवा अॅप्लिकेशनमध्ये एखादी गोष्ट सर्च करायची असेल तर F3 दाबून हे करता येतं.

​F4 Key​

तुमच्या डेस्कटाॅप किंवा लॅपटाॅपवरती अॅक्टिव्ह विंडो जर बंद करायची असेल तर Alt+F4 दाबून हे काम करता येतं.

​F5 Key​

ही फंक्शन की काय करते हे बऱ्याच जणांना माहीत असतं. रिफ्रेश किंवा रिलोड करण्यासाठी F5 की चा वापर होतो.

​F6 Key​

इंटरनेट ब्राऊझर सुरू असताना ही ‘की’ दाबल्यावर कर्सर थेट ‘अॅड्रेस बार’ मध्ये जातो. बहुतांशी सगळ्या इंटरनेट ब्राऊझर्समध्ये हे लागू होतं.

​F7 Key​

मायक्रोसाॅफ्ट वर्ड सारख्या अॅप्लिकेशनमध्ये स्पेल चेक आणि ग्रामर चेक करायला या ‘की’चा वापर करता येतो.

​F8 Key​

विंडोज् मधला बूट मेनू अॅक्सेस करण्यासाठी F8 च्या वापर होतो.

​F9 Key​

मायक्रोसाॅफ्ट वर्डमध्ये पेज रिफ्रेश करायला किंवा /मायक्रोसाॅफ्ट आऊटलूकमध्ये मेल पाठवायला किंवा स्वीकारायला ही की वापरतात.

​F10 Key​

राईट क्लिक करण्याएेवजी shift आणि F10 की दाबीनही हे काम आपण करू शकतो.

​F11 Key​

इंटरनेट ब्राऊझरमध्ये फुलस्क्रीन करण्यासाठी किंवा फुलस्क्रीनमधून बाहेर पडायला ही ‘की’ वापरली जाते.

​F12 Key​

मायक्रोसाॅफ्ट वर्डमध्ये ‘सेव्ह अॅज्..’ मेन्यू ओपन होतो.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏