.

सुस्वागतम्

सुस्वागतम ! सुस्वागतम !! सुस्वागतम !!! माझ्या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत ......

गुरुवार, ३० मार्च, २०१७

शाळा सिध्दी ...
school report card
ग्रेड निहाय कॉर्ड
खालील लिंक वर click करा...



बॉट रिमूव्हल टुल

⚪ ​असे वापरा सरकारचे मोफत अंटी व्हायरस टूल्स​ ⚪








केंद्र सरकारने संगणक व स्मार्टफोनसाठी मोफत अँटी व्हायरस टुल्स देण्याची घोषणा केली असून कुणीही युजर याचा उपयोग करू शकतो. हे टुल्स कसे वापरावेत याची ही सुलभ माहिती !

केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ‘बॉटनेट’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत देशातील संगणक, लॅपटॉप आणि स्मार्टफोन युजर्ससाठी मोफत सुरक्षा प्रणाली पुरवण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या ‘डिजीटल इंडिया’ या मोहिमेच्या अंतर्गत ‘सी-डॅक’ने याला विकसित केले आहे. यात ‘सायबर स्वच्छता केंद्र’ या नावाने एका वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले आहे. देशातील ५८ इंटरनेट सर्व्हीस प्रोव्हायडर आणि १३ बँकांनी यासाठी सरकारसोबत सहकार्याचा करार केला आहे. या अंतर्गत कुणाही युजरच्या संगणकात व्हायरस अथवा मालवेअर आढळून आल्यास त्याला तातडीने एक अलर्ट पाठविण्यात येऊन त्याच्या निर्मूलनासाठी लिंक पाठविण्यात येईल. तसेच या लिंकवर खालीलप्रमाणे विविध टुल्स देण्यात आले आहेत.

१) बॉट रिमूव्हल टुल:- क्विक हिल या सायबर सुरक्षा क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली आहे. याच्या मदतीने कुणीही आपल्या संगणकात असणारा ‘बॉट’ (जो फिशींग ई-मेल, फेक लिंक आदींच्या माध्यमातून संगणकात शिरलेला असतो!) सुलभपणे बाहेर काढू शकतो. ३२ आणि ६४ बीटसाठी याला स्वतंत्रपणे डाऊनलोड करण्याची सुविधा यात देण्यात आली आहे. एकदा या लिंकवरून कुणीही याला डाऊनलोड केल्यानंतर ‘क्विक स्कॅन’, ‘फुल स्कॅन’ आणि ‘कस्टमाईज्ड स्कॅन’ असे यात तीन पर्याय दिलेले आहेत. यात आपल्याला हव्या त्या पध्दतीने स्कॅन करून आपण आपला संगणक ‘बॉट’मुक्त करू शकतो. विशेष बाब म्हणजे या प्रक्रियेत संगणकावर संबंधीत प्रोग्रॅम इन्टॉल करावा लागत नाही. कुणाही युजरला हव्या त्या वेळेस तो ‘रन’ करता येतो. आणि तो संगणकात आधीच असणार्‍या ‘अँटी व्हायरस’सोबत वापरणे शक्य आहे. विंडोज प्रणालीवर चालणार्‍या कुणाही संगणकावर याचा वापर करता येतो.

खालील लिंकवर क्लिक करून कुणीही याचा वापर करू शकेल.


युएसबी प्रतिरोध

 युएसबी प्रतिरोध :- हे टुल ‘सी-डॅक’ने विकसित केले आहे. अलीकडच्या काळात पेन ड्राईव्हसारख्या युएसबी ड्राईव्हचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सुलभ स्टोअरेजसाठी युएसबी अतिशय उपयुक्त ठरणारे आहे. मात्र याचा तोटादेखील आहे. एक तर याच्या माध्यमातून आपल्या संगणकात व्हायरस, मालवेअर आदी घातक बाबी सहजगत्या प्रवेश करू शकतात. आणि याचसोबत याच्या मदतीने कुणीही आपल्या संगणकातील महत्वाची माहिती चोरून नेऊ शकतो. नेमका यालाच प्रतिबंध घालण्यासाठी ‘युएसबी प्रतिरोध’ हे टुल सादर करण्यात आले आहे. विंडोज ७ आणि १० या आवृत्तींवर चालणार्‍या संगणकात याचा वापर करता येणार आहे. एकदा याला संगणकावर इन्टॉल केल्यानंतर संबंधीत युजर युएसबीला पासवर्डने संरक्षित करू शकतो. अर्थात त्याच्या शिवाय कुणीही अन्य व्यक्ती त्याच्या संगणकाला युएसबी ड्राईव्ह लाऊन माहिती मिळवू शकत नाही. यासोबत युएसबीच्या माध्यमातून संगणकात शिरणार्‍या व्हायरस आणि मालवेअर्सलाही अटकाव करता येतो. हे टुल खालील लिंकवर उपलब्ध आहे.

खालील लिंकवर क्लिक करून कुणीही याचा वापर करू शकेल.

बुधवार, १५ मार्च, २०१७

जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत 25 मुद्यानूसार सराव घेण्यासाठी नमूना पेपर डाउनलोड करण्यासाठी खालील link वर क्लिक करा .......

सोमवार, १३ मार्च, २०१७

जलद प्रगत महाराष्ट्र

जलद प्रगत महाराष्ट्र

दि.13 मार्च 2017

*जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील डिजिटल शाळा, प्रगत शाळा, ABL शाळा  व ISO शाळा यांचा आढावा*
--------------------------------------------
जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील डिजिटल शाळा, प्रगत शाळा, ABL शाळा  व ISO शाळा यांचा आढावा
 घेण्यासाठी मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य।तथा मा. संचालक , विद्याप्राधिकरण यांच्या सूचनेनुसार माहिती घेण्यासाठी लिंक *दि.04 मार्च 2017 रोजी* सर्व जिल्ह्यांना देण्यात आली होती .


माहिती भरण्याची लिंक
               
                                     
                                        CLICK




सदर माहितीची सद्यस्थिती वर इमेज फाईल  मध्ये जिल्हानिहाय व एक्सेल फाईल   ( आपण सदर एक्सेल फाईल इथून डाउनलोड करु शकता - DOWNLOAD )मध्ये जिल्हा, तालुका , केंद्र निहाय माहिती प्राप्त शाळा स्थिती दर्शविलेली आहे.


*सातारा, अहमदनगर, परभणी, नाशिक, पालघर, हिंगोली, जालना जिल्हा वगळता अद्याप एकही जिल्ह्याची 50% पेक्षा जास्त माहिती आलेली नाही.*


 *गडचिरोली, औरंगाबाद, चंद्रपूर,सांगली, धुळे, नांदेड, बीड, मुंबई(उपनगर),यवतमाळ हे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेचे व शाळांचे सदर माहिती उपलब्ध करून देण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे, व  याबाबत मा. आयुक्त शिक्षण यांनी नाराजी व्यक्त केली आहे*


आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना याबाबत अवगत करून आपल्या कार्यक्षेत्रातील 100% शाळा हि माहिती भरतील याबाबत सर्वांनी जाणीवपूर्वक लक्ष द्यावे.

दि.15 मार्च 2017 पर्यंत सर्व शाळा माहिती भरतील यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात.

*- मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य तथा मा. संचालक , विद्या प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सूचनेनुसार*

सोमवार, ६ मार्च, २०१७

​दि.4 मार्च 2017​

​जलद प्रगत महाराष्ट्र कार्यक्रम आढावा​
.................................................

प्रति,
मुख्याध्यापक,
सर्व शाळा

जलद प्रगत महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत राज्यातील 100 % शाळा डिजिटल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सदर उद्दिष्टप्राप्तीचे ध्येय साध्य करण्यासाठी शाळेच्या अचूक UDISE नंबर सह खालील फॉर्म भरावा.



 - मा. संचालक, महाराष्ट्र विद्या प्राधिकरण , पुणे

................…..............................
​सदर पोस्ट सर्व ग्रुपवर पाठविण्यात यावी हि विनंती.​