.

सुस्वागतम्

सुस्वागतम ! सुस्वागतम !! सुस्वागतम !!! माझ्या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत ......

गुरुवार, ३० मार्च, २०१७

बॉट रिमूव्हल टुल

⚪ ​असे वापरा सरकारचे मोफत अंटी व्हायरस टूल्स​ ⚪








केंद्र सरकारने संगणक व स्मार्टफोनसाठी मोफत अँटी व्हायरस टुल्स देण्याची घोषणा केली असून कुणीही युजर याचा उपयोग करू शकतो. हे टुल्स कसे वापरावेत याची ही सुलभ माहिती !

केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ‘बॉटनेट’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत देशातील संगणक, लॅपटॉप आणि स्मार्टफोन युजर्ससाठी मोफत सुरक्षा प्रणाली पुरवण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या ‘डिजीटल इंडिया’ या मोहिमेच्या अंतर्गत ‘सी-डॅक’ने याला विकसित केले आहे. यात ‘सायबर स्वच्छता केंद्र’ या नावाने एका वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले आहे. देशातील ५८ इंटरनेट सर्व्हीस प्रोव्हायडर आणि १३ बँकांनी यासाठी सरकारसोबत सहकार्याचा करार केला आहे. या अंतर्गत कुणाही युजरच्या संगणकात व्हायरस अथवा मालवेअर आढळून आल्यास त्याला तातडीने एक अलर्ट पाठविण्यात येऊन त्याच्या निर्मूलनासाठी लिंक पाठविण्यात येईल. तसेच या लिंकवर खालीलप्रमाणे विविध टुल्स देण्यात आले आहेत.

१) बॉट रिमूव्हल टुल:- क्विक हिल या सायबर सुरक्षा क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली आहे. याच्या मदतीने कुणीही आपल्या संगणकात असणारा ‘बॉट’ (जो फिशींग ई-मेल, फेक लिंक आदींच्या माध्यमातून संगणकात शिरलेला असतो!) सुलभपणे बाहेर काढू शकतो. ३२ आणि ६४ बीटसाठी याला स्वतंत्रपणे डाऊनलोड करण्याची सुविधा यात देण्यात आली आहे. एकदा या लिंकवरून कुणीही याला डाऊनलोड केल्यानंतर ‘क्विक स्कॅन’, ‘फुल स्कॅन’ आणि ‘कस्टमाईज्ड स्कॅन’ असे यात तीन पर्याय दिलेले आहेत. यात आपल्याला हव्या त्या पध्दतीने स्कॅन करून आपण आपला संगणक ‘बॉट’मुक्त करू शकतो. विशेष बाब म्हणजे या प्रक्रियेत संगणकावर संबंधीत प्रोग्रॅम इन्टॉल करावा लागत नाही. कुणाही युजरला हव्या त्या वेळेस तो ‘रन’ करता येतो. आणि तो संगणकात आधीच असणार्‍या ‘अँटी व्हायरस’सोबत वापरणे शक्य आहे. विंडोज प्रणालीवर चालणार्‍या कुणाही संगणकावर याचा वापर करता येतो.

खालील लिंकवर क्लिक करून कुणीही याचा वापर करू शकेल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा