.

सुस्वागतम्

सुस्वागतम ! सुस्वागतम !! सुस्वागतम !!! माझ्या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत ......

आधारकार्ड दुरुस्थ

​​असं करा आधारकार्ड दुरुस्थ​​

आधारकार्डच महत्व आपणा सर्वांना माहिती आहे. रिलायंन्सच्या जिओ सीमच कनेक्शन सुद्धा आधार कार्ड असलेल्यांना केवळ 15 मिनिटात दिले जाणार आहे. आधारकार्ड बनवणे सोप्पे असले तरी आधारकार्डवर झालेल्या चुका कुठे दुरुस्थ करायच्या हेच माहिती नसत. त्यामुळे आम्ही आधारकार्ड दुरुस्थ करण्याच्या स्टेप सांगणार आहोत…

स्टेप 1 :  ​​लॉग ईन विथ आधार​​
सर्वात पहिले UIDAI ची वेबसाईट http://uidai.gov.in  ला भेट द्या. त्यानंतर युअर आधारवर क्लिक करा. त्यानंतर लॉग इन करण्यासाठी तुमचा आधार कार्ड नंबर आणि टॅक्स व्हेरिफीकेशनसाठी स्पेशल कॅरेक्टर टाका.

स्टेप 2 :  ​​डेटा अपडेट रिक्वेस्ट​​

या पेजवर नाव, जेंडर, जन्मतिथी, पत्ता, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी अपडेट करण्याचे पर्याय दिले असतील. यातील तुम्हाला जो बदल करायचा आहे तो करू शकता. योग्य माहिती भरा आणि सबमिट बटन दाबा. तुम्हाला एक रिक्वेस्ट नंबर दिला जाईल जो तुम्ही प्रिन्ट किंवा पिडीएफ फॉर्मॅटमध्ये सेव्ह करू शकता. या रिक्वेस्ट नंबर द्वारे तुम्ही ऑनलाईन आधार कार्डसाठी केलेल्या बदलांना ट्रॅक करू शकता.

स्टेप 3 :  ​​संबंधित कागदपत्रे अपलोड करा​​

जर तुम्हाला आधार कार्डवरील नाव, पत्ता किंवा जन्मतारीख बदलायची असेल तर त्यासंबंधीत कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल. साईटवर दिल्या गेलेल्या माहितीनुसार फाईल अपलोड करून सबमिट बटन दाबावे.

स्टेप 4 :  ​​बीपीओ सर्व्हिस प्रोव्हायडर​​

त्यानंतर तुम्हाला कार्ड अपडेट करण्यासाठी एजन्सीची निवड करावी लागेल. जी तुम्ही ऑनलाईन निवडू शकता. एजन्सी सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर कन्फर्मेशन मॅसेज येईल आणि दोन ते तीन आठवड्यात तुमचं आधार कार्ड अपटेड होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा