.

सुस्वागतम्

सुस्वागतम ! सुस्वागतम !! सुस्वागतम !!! माझ्या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत ......

अध्यापनाच्या अनोख्या पद्धती

अध्यापनाच्या अनोख्या पद्धती

अध्यापनाच्या अनोख्या पद्धती 

🔷 विद्यार्थ्यांना पाहून तयार केल्या अध्यापनाच्या अनोख्या पद्धती…🔶
शिक्षकच विद्यार्थ्यांना शिकवतात असे नाही, तर विद्यार्थ्यांकडूनही शिक्षकाला भरपूर शिकायला मिळते. विशेषकरून अध्यापनपद्धती. अभ्यासक्रम ठरलेला असू शकतो; मात्र त्याची पद्धत नसते. विद्यार्थ्यांना पाहून शिक्षक काही अाविष्कार करतात आणि त्यास आणखी ग्रहणशील बनवण्याचा प्रयत्न करतात. वर्गातील अध्यापन अनुभवातून शिकलेल्या काही शिक्षकांच्या अशाच काही अाविष्कारांबाबत त्यांनी आपल्या पुस्तकात माहिती दिलेली आहे. जाणून घेऊया याविषयी अधिक…
1)स्टोरी ऑफ माय लाइफ : हेलेन केलर
 🔹सारांश🔸
हेलेन केलर १९ महिन्यांची असताना एका आजारामुळे तिची श्रवणशक्ती व वाचा गेली. आपल्या भावना व्यक्त करण्यास असमर्थ ठरली. उपचाराचाही काही फायदा झाला नाही. नंतर तिची एन. सुलिवान या शिक्षिकेशी भेट झाली. पहिल्याच दिवशी सुलिवान यांनी हेलेनला एक बाहुली देत हातावर एक आकृती काढून त्याचे नाव लिहिले. हेलेनला ते खूपच आवडले आणि नंतर तिने वारंवार प्रयत्न करून योग्यप्रकारे लिहिणे शिकले. त्यानंतर ती आईकडे हे सांगायला गेली की आता ती मनातील भावनाही लिहू शकते. 
🔹शिकवण🔸
शिक्षकाला प्रत्येक प्रकारच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत माहीत असते. ते आपल्या इच्छा विद्यार्थ्यांवर थोपवत नाहीत, तर त्यांची मनोवृत्ती आणि आवड जाणून घेऊन त्यानुसारच अध्यापन करतात.
2) टॉक्स टू मदर्स : ल्युसी व्हिलॉक
🔹सारांश🔸
कुटुंब असो की शाळा, मुलांना प्रेमासोबतच शिस्तीचेही धडे द्यायला हवे. त्यांना सुविधा मिळाव्यात. सोबतच परिस्थितीला सामोरे जाण्याची शिकवणही मिळायला हवी. त्यांच्या गरजा आणि इच्छा पूर्ण व्हाव्यात. मात्र, प्रत्येक हट्ट पुरवल्याने व्यक्तिमत्त्व विकास प्रभावित होतो. ही सवय भविष्यात मोठी अडचणीची ठरू शकते. या सर्वांत आईची खूप महत्त्वाची भूमिका असते. कारण तीच बालकाचा पहिला गुरू असते. आईचे प्रेम बालकास कठीण पाठही सहज शिकवून जाते, तर तिने दिलेली शिस्त त्याच्या आयुष्याला यशाच्या मार्गावर आणते.
🔹शिकवण🔸
शिक्षक फक्त चांगल्या गोष्टीच सांगत नाहीत, तर विद्यार्थ्यांना चांगल्या-वाईटातील फरक कळावे यासाठी चुकीच्या गोष्टींपासून सावधही करत असतो. सुविधासंपन्न झाल्यानंतरही बालकांना संघर्षासाठी तयार करायला हवे.
3) टू सर, विथ लव्ह : ई. आर. ब्रेथवेट
🔹सारांश🔸
वर्गात शिक्षकाचे म्हणणे ऐकायला विद्यार्थी तयार नव्हते. शिक्षक सांगायचे त्याउलट विद्यार्थी वागायचे. शिकण्यापेक्षा ते शिक्षकाला रागीट बनवण्याचा प्रयत्न करायचे. त्यामुळे शिक्षक त्यांना शिकवणे बंद करायचे. याचा परिणाम असा झाला की, वर्गात उशिराने येणारी पामेला डेअर शिक्षकाच्या परवानगीविनाच वर्गात प्रवेश करू लागली. ब्रेथवेट शिकवतानाच लागलीच त्याचेच उदाहरण बनवायचे. ते म्हणायचे, वर्गात प्रवेश करण्याच्या दोन पद्धती असतात. एक उद्धट आणि दुसरी विनयशील. त्यामुळे या उदाहरणाचा थेट डेअरवर परिणाम झाला. नंतर ती बाहेर गेली आणि अत्यंत विनयशील पद्धतीने तिने वर्गात प्रवेश केला. त्यामुळे कित्येकदा अशा गोष्टींतून सहज शिकवण दिली जाऊ शकते.
🔹शिकवण🔸
विद्यार्थ्यास शिस्त शिकवण्याची पद्धत शिक्षकाला माहीत असते. शिकवता शिकवताच त्यांची चाणाक्ष बुद्धी विद्यार्थ्यांची मनेही जाणून घेत असते
4) अप फ्रॉम स्लेव्हरी : बुकर टी. वॉशिंग्टन
🔹सारांश🔸
वर्णभेदामुळे अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या शिक्षणाची व्यवस्था नव्हती. त्यांना फक्त घरकाम आणि शेतात मजुरी करण्यालायकच समजले जायचे. त्यांना शिकण्याची पद्धतही माहीत नव्हती. मात्र,त्यांच्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष शाळेत त्यांना फक्त पुस्तकी ज्ञानच दिले जात नाही, तर मजुरी किंवा इतरांवरच अवंलबून राहण्याची गरज नसावी यासाठी उदरनिर्वाहाची कौशल्येही शिकवली जातात. याठिकाणी अर्थव्यवस्था व औद्योगिक ज्ञानासोबतच नीट कपडे घालणे, शरीराकडे लक्ष देणे आदी बाबीही शिकवल्या जातात.
🔹शिकवण🔸
फक्त पुस्तकी ज्ञान दिल्यानेच शिक्षकाची जबाबदारी संपत नाही,तर आयुष्यातील प्रत्येक स्थितीचा सामना करण्यासाठी आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी आवश्यक धडेही देत असतात.
5) लेटर फ्रॉम अ सेल्फमेड मर्चंट टू हिज सन : जॉर्ज एच. लॉरिमर
🔹सारांश🔸
हार्वर्ड विद्यापीठात अध्ययनासाठी गेलेल्या मुलास वडील एक गांभीर्यपूर्ण सल्ला देतात. त्यांच्या मते, शिकवणारा कोण आहे?यामुळे खूप काही फरक पडत नाही, तर आपण त्यांनी दिलेले शिक्षण कसे ग्रहण करतो, हे महत्त्वाचे ठरते. शिक्षण ही एकमेव अशी संकल्पना आहे ज्याची काही मर्यादा नाही. आपल्या मनमर्जीने आपण हवे तितके ते प्राप्त करू शकतो. या केवळ पुस्तकी गोष्टी नाहीत, तर यातून वडील पाल्यास प्रत्येक व्यक्ती आणि परिस्थितीत जगण्याची पद्धत शिकण्याचाही अमूल्य सल्ला देतात. याठिकाणी वडीलच शिक्षकाच्या भूमिकेत दिसतात.
🔹शिकवण🔸
वर्गात शिकवतो तोच शिक्षक नसतो, तर आयुष्याच्या कोणत्याही वळणावर ज्याच्याकडून आपल्याला शिकायला मिळते ते स्वीकारायला हवे.
📝 संकलक 📝
🗼 आशा चिने 🗼

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा